Title of the document
top of page

​लोकमत24

ayurvedic upay|आयुर्वेदिक उपाय
health| आरोग्य
lifestyle | जीवनशैली

नमस्कार,lokmat२४ या महाराष्ट्रातील लोकप्रिय वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 

जेवण | food
dite|आहार
खाण्याचे फायदे |advantages of eating
immunity power|रोगप्रतिकार शक्ती

सकाळच्या नाश्त्यामध्ये या ५ पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी आयुष्य जगा!

 

सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतो.

सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 

 मात्र, अनेकजण वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी सकाळचा नाश्ता

टाळतात. तुम्ही पण असे करत असाल तर आपण अनेक मोठ्या आजारांना

निमंत्रणच देत आहात. कारण सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत

आवश्यक असतो. त्यामध्येही तुम्ही काही पदार्थांचे नाश्त्यामध्ये सेवन केले तर

थकवा आणि कमजोरी तुम्हाला कधीच येणार नाही.

 

१) शेंगदाणे -

                                                                         शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत,                                                                                                           हे देखील आपल्याला ठाऊक नसेल. तज्ज्ञांच्या मते                                                                                                                  शेंगदाण्यात 25 टक्क्यांहून अधिक प्रथिने असतात.                                                                                                              तज्ज्ञांच्या मते,  250 ग्रॅम शेंगदाण्यात जितके प्रोटीन आणि                              व्हिटामिन असतात, तितके 250 ग्रॅम मांसतही सापडत नाहीत. त्याच वेळी, एक अंड आणि दुधातील प्रथिने आपल्याला काही शेंगदाणे देऊ शकतात. जर एखादी व्यक्ती नियमितपणे शेंगदाणे खात असेल तर त्यांच्या शरीराला आवश्यक दूध, बदाम आणि तूप यांचे पोषण मिळते. यामुळे आपण सकाळी नाश्त्यामध्ये दररोज शेंगदाणे खाल्ले पाहिजेत

 

२) अंडी -

नाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही.

त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात.

ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते.

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो

तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो.

अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

 

३) मोसंबी -संत्री -

 

 

 

 

मोसंबी आणि संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते. म्हणून मोसंबीचे खाणे चांगले मानले जाते. आता सध्याच्या काळात तर अनेक वेळा डाॅक्टर रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबीचे खाण्याचा सल्ला देखील देतात. मोसंबीचे सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्याही दूर होते. कारण ते शरीर डिटॉक्सीफाई करते आणि मोसंबी खाल्लाने केल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडते. यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये मोसंबीचे सेवन केले पाहिजे.

 

४) कोमट पाणी -

एक ग्लास कोमट पाण्यात मध मिक्स करा आणि प्या. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल. हिवाळा असो किंवा उन्हाळा, शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लीटर ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाण्यात मध मिक्स करून पिल्याने  तुमची पचन क्रिया देखील मजबूत राहते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच, डिहायड्रेशन देखील टाळता. कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीही बळकट होते. जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल, तर आपण नक्कीच गरम पाण्याचे सेवन केले पाहिजे.

 

५) बदाम -

बदामांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोकाही वाढत नाही. या व्यतिरिक्त, बदाम आपल्या शरीराची चयापचय टिकवून ठेवतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप 2 मधुमेहाचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.

अशक्तपणा थकवा त्वरित घालविणारे हे १२ पदार्थ खायला सुरू करा

 

सतत काळजी करणे,दु:खाला कवटाळून बसणे,कामाचा मानसिक ताण,अपुरी झोप,सत्व नसलेले पदार्थ खाणे,

जास्त मेहनत करणे, शरीरात पाण्याची कमतरता किंवा स्मोकिंग किंवा कॅफिनची सवय यामुळे अशक्तपणा थकवा येऊ शकतो. शरीरातील (Weakness)अशक्तपणा दूर करण्यासाठी कित्येक औषध आणि टॉनिकचा वापर करतात पण, तुमच्या किचनमधील हे  १० पदार्थ तुम्हाला पुरेशी उर्जा मिळवून देऊन तुमचा थकवा दूर करू शकतात. कोणते आहेत हे १० पदार्थ जाणून घेऊ या

 

१) केळी खा :

                                                           शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचा समावेश करा. केळीमध्ये पोटॅशियम असते जे                                                                       शरीरातील शर्करेचे ऊर्जेत रूपांतर करते.केळीमध्ये व्हिटॅमिन बी,सी,ओमेगा ३ फॅटी अॅसिड,फायबर,कार्बोहायड्रेट्स ही                                                                  पोषकतत्वे असतात ज्यामुळे डिहायड्रेशन,अशक्तपणा दूर होतो.यातील नैसर्गिक साखर शरीरातील ऊर्जेची पातळी लवकर वाढवण्यास मदत करते.

२) पालक -

लोहयुक्त पालक रक्ताची कमतरता यांवर प्रभावी आहे.रक्तकोशिकांना आॅक्सीजन

पुरविण्याचे काम पालकातील लोहतत्व करत असतात यामुळे शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो.

यात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम,व्हिटॅमिन सी,बी असते.

 

३) कलिंगड-

                                                               यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे डिहायड्रेशन कमी करून शरीराला अॅक्टीव्ह करते.तसेच यात पोटॅशियम,व्हिटॅमिन                                                               सी,लायकोपेन,बुटासिंग केरोटीन आणि आयर्नसारखे पोषकतत्वे असतात ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो.

 

 

 

४) दही- दह्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि हेल्दी प्रोबायोटिक्स थकव्याशी आणि अशक्तपणाशी लढायला मदत करतात.कुठल्याही आहारापेक्षा दह्यावर शरीर पटकन प्रक्रिया करू शकतं म्हणून याला एनर्जीचा इन्स्टंट सोर्स मानतात.

 

 

५) ड्रायफ्रुट्स-बिया खा -

                                                                              शरीराच्या अशक्तपणापणावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात सुका मेवा आणि बियांचा                                                                                  समावेश करावा. यासाठी तुम्ही बदाम, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, चिया बिया आणि अंबाडीचे सेवन करू                                                                                    शकता. हे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतील आणि अशक्तपणा दूर करतील.

 

 

६) खूप पाणी प्या :

पुरेशा प्रमाणात पाणी न पिल्यानेही तुमच्या शरीराला थकव जाणवू शकतो. त्यामुळे पाणी जरूर प्या, ते तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवण्यास मदत करेल. अशक्तपणा दूर करायचा असेल तर तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक टी देखील घेऊ शकता.

 

७) ओटमील सर्वोत्तम पर्याय - शरीराला ऊर्जा देण्यासाठी

आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज दलिया (Dalia) खा.

तुम्हीही या सोबत दूध घेतल्यास ते तुमच्यासाठी अधिक

चांगले होईल. तुम्ही मल्टीग्रेन ब्राउन ब्रेड देखील खाऊ शकता.

तुमचे बॉब्स योग्य प्रमाणात मिळाल्याने कमकुवतपणाचा खर्च दूर होईल.

 

 

 

८) पनीर खा -

                                                                            जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही पनीर चीज, स्प्राउट्स आणि बीन्स सारख्या गोष्टींचीही मदत घेऊ शकता.                                                                             हे प्रथिनयुक्त पदार्थ आहेत ज्यात मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते आणि ते शरीराला ऊर्जा देते.

 

९) अंडे खा -

शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी तुम्ही रोज अंडी (EGG) खाऊ शकता.

 

१०) भोपळा बिया -

                                                                                  यातील ट्रायप्टोफीन मानसिक थकव्याशी लढते आणि आपल्याला उत्तम झोप मिळते.मूठभर भोपळ्याच्या                                                                                  बिया इंस्टंट एनर्जीसाठी उत्तम असतात.बिया भाजूनही खाऊ शकता.

 

 

 

११) ओटमील -

हे थकव्यासाठी प्रभावी असते.यात उच्च प्रतीचे कार्बोहायड्रेट्स ग्लायकोजेनच्य रूपात शरीरात जमा होतात मेंदूला आणि पेशींना दिवसभराची एनर्जी देतात.ओटमील मध्ये प्रोटीन,मॅग्नेशियम, फाॅस्फरस आणि व्हिटॅमिन बी१ ही पोषकतत्वे असतात जी आपली एनर्जी केवळ वाढवतात.

 

१२) शिमला मिरची-

                                                                       यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात.यातील अँटीआॅक्सीडंट्स प्रतिकारशक्ती वाढतात तसेच ताण निर्माण                                                                          करणारे हार्मोन्स कोर्टीसाॅल कमी करण्यास मदत करतात.ज्यामुळे थकवा दूर होतो.

                                                                       यात व्हिटॅमिन सी असते जे शारिरीक अन् मानसिक ताणाचा प्रभाव कमी करण्यात मदत करते.

download (13).jpg
download (7).jpg
download (6).jpg
download (9).jpg
download (10).jpg
download (11).jpg
download (5).jpg
download (12).jpg
download (14).jpg

स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी हे ३० नियम लक्षात ठेवा

(१) सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट, हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.

(२) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात ॲसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(३) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(४) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(५) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(६) ४८ प्रकाचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिश आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत होते.

(७) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(८) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(९) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(१०) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(११) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(१२) स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा ॲटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१३) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१४) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१५) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१६) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१७) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व ॲसिडिटी होत नाही.

(१८) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चघळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१९) नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(२०) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२१) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वयंपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वयंपाक केल्यास १००% पोषकतत्वं, काशाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९७%  पोषकतत्वं, पिताळाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९३% पोषकतत्वं, अल्युमिनियमच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ७ ते १३% पोषक तत्वं असतात

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजासारखे म्हणजे पोटभर तर दुपारचे भोजन राजकुमारासारखे म्हणजे लहान मुलासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजे खूप कमी असावे.

© 2035 by Natural Remedies. Powered and secured by Wix

  • b-facebook
  • Twitter Round
bottom of page